दुर्गे दुर्गट भारी आरती
🔊 दुर्गे दुर्गट भारी आरती ऐका
0:00
0:00
दुर्गे दुर्गट भारी – संपूर्ण आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥ जय देवी…
दुर्गा आरती म्हणण्याचे फायदे
दुर्गे दुर्गट भारी आरती केल्याने भीती दूर होते, मनाला बळ मिळते आणि संकटांपासून संरक्षण मिळते. नवरात्र, शुक्रवार आणि सकाळ-संध्याकाळ देवीची आरती करणे अत्यंत शुभ मानले जाते.
