Calender 2025-2026
गणपती आरती मराठी फोटो
गणपती आरती मराठी
🔊 गणपती आरती ऐका
0:00 0:00

श्री गणपती आरती – सुखकर्ता दुःखहर्ता

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ताफळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनःकामना पूर्ती जय देव जय देव रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा चंदनाची उटी कुंकुमकेशरा हिरे जडीत मुकुट शोभतो बरा रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनःकामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवरबंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनःकामना पूर्ती जय देव जय देव

गणपती आरती म्हणण्याचे फायदे

गणपती आरती म्हटल्याने मन शांत होते, विघ्ने दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सकाळी किंवा संध्याकाळी गणपती आरती म्हणणे शुभ मानले जाते. ही आरती म्हणल्याने मनाला शांती मिळते आणि सर्व कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतात.

Home
Search
आरती
Age Calculator
Back