Marathi Calendar 2026
शिव आरती मराठी फोटो - शंकराची आरती
शंकराची आरती मराठी
🔊 शंकराची आरती ऐका
0:00 0:00

श्री शंकराची आरती – जय देव जय देव

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा | वीषे कंठी कला त्रिनेत्री ज्वाळा | लावण्यसुंदर मस्तकी बाळा | तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा || १ || जय देव जय देव जय श्रीशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा || धृ || कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा | अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा | विभूतीचे उधळण शितिकंठ निळा | ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा | जय देव || २ || देवी दैत्यी सागर मंथन पै केले | त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले | तें त्वां असुरपणे प्राशन केलें | नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले | जय || ३ || व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी | पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी | शतकोटीचे बीज वाचे उच्चारी | रघुकुळटिळक रामदासाअंतरी || जय देव || ४ ||

शंकराची आरती म्हणण्याचे फायदे

शंकराची आरती म्हटल्याने मनाची शांती मिळते, सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. महादेवाची आरती रोज संध्याकाळी म्हणल्यास मन प्रसन्न राहते आणि घरात सुख-समृद्धी येते. शिव आरती म्हणून भक्त शिवाची कृपा मिळवतात आणि त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात.

शिव आरतीचे महत्व

शिव आरती ही भगवान शंकराची स्तुती आहे. ही आरती म्हणताना भक्तांना शिवाच्या विविध स्वरूपांचे स्मरण होते. नित्य आरती करणाऱ्या भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो. शिवरात्रीच्या दिवशी ही आरती विशेष महत्वाची मानली जाते.

📅

मराठी कॅलेंडर २०२६

हे अ‍ॅप तुम्हाला उपयुक्त वाटत असेल,
तर Google Play वर ⭐⭐⭐⭐⭐ रेट करा.

तुमचा एक रिव्ह्यू आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देतो ❤️

Home
Calendar
पंचांग
आरती
Age Cal-c