Marathi Calendar 2026
विठ्ठल आरती मराठी
युगे अठ्ठावीस विठ्ठल आरती
🔊 विठ्ठल आरती ऐका
0:00 0:00

श्री विठ्ठल आरती – युगे अठ्ठावीस

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव ।। धृ० ।। तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ।। २ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।। धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा । राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।। ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती । दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।। आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती । दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।। रचनाकार – संत नामदेव महाराज

विठ्ठल आरती म्हणण्याचे महत्त्व

विठ्ठल आरती केल्याने भक्तीभाव वाढतो, मन शांत होते आणि जीवनात सकारात्मकता येते. युगे अठ्ठावीस आरती ही वारकरी संप्रदायाची अत्यंत पवित्र आरती मानली जाते.

📅

मराठी कॅलेंडर २०२६

हे अ‍ॅप तुम्हाला उपयुक्त वाटत असेल,
तर Google Play वर ⭐⭐⭐⭐⭐ रेट करा.

तुमचा एक रिव्ह्यू आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देतो ❤️

Home
Calendar
पंचांग
आरती
Age Cal-c